कत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:42+5:302021-04-22T04:15:42+5:30

पोलीस निरीक्षक अनंत तारगे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, सहायक निरीक्षक बैरागी, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस शिपाई ...

Two animals were taken into custody for slaughter | कत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे ताब्यात

कत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे ताब्यात

Next

पोलीस निरीक्षक अनंत तारगे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, सहायक निरीक्षक बैरागी, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस शिपाई महेश कुमावत व होमगार्ड असे पथक संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करीत होते. या पथकास पालखेड चौफुलीवर आयशर (क्र. जीजे २१ डब्लू ६७१४) गाडी चार गायी व एका वासरूची वाहतूक करताना आढळून आली. पोलिसांनी आयशर गाडीसह ११ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, गोवंश बंदी कायदा व कोरोना विषाणू संदर्भात असलेले कायदे यांचे उल्लंघन केल्यामुळे वाहनचालक प्रभुभाई सोनुभाई वळवी (४०) व संदीपभाई देवरामभाई गार्डर (२८, दोघेही रा. आंबापाडा ता.वघई जि. अहवा डांग, गुजरात) यांना अटक करण्यात आली. पाचही जनावरांना चारापाण्यासाठी गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

फोटो- २१ दिंडोरी १

दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले कत्तलीसाठी वाहतूक करणारे वाहन. समवेत पोलीस निरीक्षक अनंत तारगे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व कर्मचारी.

===Photopath===

210421\21nsk_22_21042021_13.jpg

===Caption===

दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले कत्तलीसाठी वाहतूक करणारे वाहन. समवेत पोलीस निरीक्षक अनंत तारगे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व कर्मचारी.

Web Title: Two animals were taken into custody for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.