हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 01:41 AM2022-07-06T01:41:20+5:302022-07-06T01:41:45+5:30

दोन आठवड्यांपूर्वी हनुमानवाडी परिसरात घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. वाहन काचा फोडल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित पसार झाला आहे.

Two arrested for vandalizing a vehicle in Hanumanwadi | हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात

हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात

Next

पंचवटी : दोन आठवड्यांपूर्वी हनुमानवाडी परिसरात घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. वाहन काचा फोडल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित पसार झाला आहे.

गेल्या जून महिन्यात (दि.२४) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हनुमान वाडीतील शिवशक्ती अपार्टमेंटसमोर अज्ञात इसमाने चारचाकी वाहनांच्या अज्ञात कारणावरून काचा फोडून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर निवृत्ती तुकाराम मौले यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दहावी तक्रार दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात दखलपात्र होण्याची नोंद केली होती.

हनुमान वाडीत वाहनांच्या काचा फोडणाऱ्या संशोधन शोध घेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांना गुप्त बातमी दारामार्फत वाहनाच्या काचा फोडणाऱ्या संशयितांची नावे मिळाली त्यावरून गुन्हा शोध पथकाच्या पोलिसांनी हनुमान वाडीतच राहणाऱ्या अजित गंगाराम साबळे, राकेश रामदास शेवाळे, गणेश भास्कर कालेकर या तिघांची नावे निष्पन्न केली त्यानंतर साबळे व शेवाळे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे, तर कालेकर हा फरार झाला आहे.

----

दारूच्या नशेत काचा फोडल्या

 

हनुमान वाडीत उभ्या चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दारूच्या नशेत वाहनाच्या काचा फोडण्याची कबुली पोलिसांना दिली.

Web Title: Two arrested for vandalizing a vehicle in Hanumanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.