मद्यसेवनास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:14 AM2019-01-08T01:14:47+5:302019-01-08T01:15:08+5:30
मद्यसेवन करणाºयांना हटकणाºया तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील इरिगेशन कॉलनीतील तलाठी कार्यालयाजवळ घडली़
नाशिक : मद्यसेवन करणाºयांना हटकणाºया तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील इरिगेशन कॉलनीतील तलाठी कार्यालयाजवळ घडली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात जातीवाचक शिवीगाळ (अॅट्रॉसिटी) तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरिगेशन कॉलनीतील रहिवासी आकाश भालेराव (२१, रा़ रुम नंबर १२) हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भाऊ गिरीश व मित्र हरीशसोबत शेकोटी करून शेकत होते़ यावेळी तलाठी कार्यालयातून आरडाओरड व शिवीगाळ सुरू असल्याचा आवाज आल्याने ते तिथे गेले़ या ठिकाणी संशयित सचिन प्रभाकर पिंगळे, महेश दिलीप कर्पे शुभम रमेश मोहिते व प्रवीण सानप हे चोघे मद्यसेवन करीत होते़
आकाश भालेराव याने या चौघांना या ठिकाणी मद्यसेवन करू नका, असे सांगितले असता संशयित सचिन पिंगळे याने जातीवाचक उल्लेख करून शिवीगाळ केली व डोक्यात फरशी टाकून डोके फोडले. यानंतर यांनी लाठीने आकाशचा भाऊ गिरीश यास मारहाण केली़
पंचवटीतून दुचाकीची चोरी
जुने नाशिकमधील काझीपुरा कोट येथील रहिवासी महेश मरवट यांची ७० हजार रुपये किमतीची नवीन अॅक्टिवा दुचाकी चोरट्यांनी पंचवटीतील वाघाडीजवळ असलेल्या बजरंग मंदिराजवळून १ नोव्हेंबर २०१८ रोजी चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़