गोरेवाडी परिसरात दोन दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:43 AM2018-07-09T01:43:24+5:302018-07-09T01:43:44+5:30

नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे या दुचाकी उभ्या केलेल्या खिडकीलगत झोपलेल्या इसमास वेळीच जाग आली नसती तर अनर्थ घडला असता़ दरम्यान, या प्रकरणी संजय शिवबालक राम (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 Two bikes were burnt in the Gorevadi area | गोरेवाडी परिसरात दोन दुचाकी जाळल्या

गोरेवाडी परिसरात दोन दुचाकी जाळल्या

Next

नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे या दुचाकी उभ्या केलेल्या खिडकीलगत झोपलेल्या इसमास वेळीच जाग आली नसती तर अनर्थ घडला असता़ दरम्यान, या प्रकरणी संजय शिवबालक राम (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संजय राम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरेवाडीतील शास्त्रीनगर येथील राहत्या घराच्या भिंतीलगत त्यांच्या प्लेझर मोपेड (एमएच १५, इके ५२८७) आणि होंडा एव्हिएटर मोपेड (एमएच १५, सीएफ ४३२८) या दुचाकी नेहमीप्रमाणे लावलेल्या होत्या़ रात्री अडीच वाजेच्या सुमारास राम यांना अचानक जाग आली असता त्यांच्या दोन्ही दुचाकी जळत असल्याचे खिडकीतून दिसले. त्यांनी कुटुंबातील इतरांना जागे करून या दुचाकींवर पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या़
दुचाकींजवळ पेट्रोलचा वास येत असलेली प्लॅस्टिकची रिकामी बाटली व आगपेटी आढळून आली़ अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दोन्ही दुचाकी जाळल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबरोबरच अरिंगळे मळा व एकलहरे रोड येथील दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याचे वृत्त असून, याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही़ या दुचाकी जळीत तसेच वाहनांच्या काचा फोडण्याच्या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़

Web Title:  Two bikes were burnt in the Gorevadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.