दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 11:09 PM2022-03-28T23:09:20+5:302022-03-28T23:09:39+5:30

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

Two brothers fell into a pond and died | दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील लोणवाडीतील घटना : अद्याप पोलिसांकडे नोंद नाही

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात राहणाऱ्या माणिक लक्ष्मण गायकवाड यांची दोन मुले कुणाल ( ४) व गौरव (७) ही शेततळ्याच्याच परिसरात खेळत असताना, अचानक कुणाल पाण्यात पडला. त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. भाऊ तळ्यात पडल्याचे लक्षात येताच गौरवने आरडाओरडा केला, मात्र कोणीच मदतीला नसल्याने, गौरव स्वतः आपल्या भावाला वाचविण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र छोट्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.
दरम्यान माणिक लक्ष्मण गायकवाड यांना आपली दोन्ही मुले जवळपास न दिसल्याने त्यांनी गौरव आणि कुणाल यांचा शोध घेतला. पण त्यांना दोघे कुठेही दिसले नाहीत. त्यांनी तळ्यात बघितले असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.

कुणाल आणि गौरव हे दोघेही सोडून गेल्याने संपूर्ण गाव शोकमग्न बनला होता. शोकाकुल वातावरणात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते आणि आजी असा परिवार आहे.
दरम्यान, ही घटना बुधवारी (दि.१६) घडली. मात्र पोलीस ठाण्यात त्याची अद्याप १३ दिवसांनंतरही नोंद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटना घडून आज १३ दिवस झाले, मात्र या घटनेची नोंद अद्यापही केलेली नाही.

घटनेला १३ दिवस...
लोणवाडीतील या दोन चिमुकल्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून अंत झाल्याची घटना बुधवारी (दि. १६) घडली. मात्र याची पोलीस दरबारी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. घटनेच्या दोन आठवड्यांनंतरही अद्याप पोलिसात नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

देशसेवेत पाठविण्याचे स्वप्न अधुरे
वडील माणिक गायकवाड यांचे बंधू संदीप गायकवाड हे पोलीस सेवेत मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुणाल आणि गौरव पोलीस आणि देशसेवेत जाणार असल्याचे स्वप्न लहान असतानाच बघत होते. मात्र काळाने त्यांना हिरावून नेले.

अल्पभूधारक शेतकरी
अवघी दोन बिघा जमीन. त्यात दोघे भाऊ. एक मुंबईमध्ये पोलीस, तर दुसरा शेती व्यवसाय करतो. त्यास कुणाल आणि गौरव अशी दोन मुले असल्याने, जमीन न करता त्यांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने ते स्वप्न धुळीस मिळवले.

Web Title: Two brothers fell into a pond and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.