काननवाडी शिवारात ‘त्या’ बिबट्यासाठी दोन पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:11+5:302021-06-25T04:12:11+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव शिवारातील काननवाडी परिसरात वनविभागाने घटनास्थळाजवळच दोन पिंजरे लावले असून, ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत. मात्र, ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव शिवारातील काननवाडी परिसरात वनविभागाने घटनास्थळाजवळच दोन पिंजरे लावले असून, ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत. मात्र, काल रात्रीही बिबट्याने पिंजऱ्याकडे पाठ फिरवल्याने वनविभागाकडे मोठा पेच निर्माण झाला आहे.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आईसोबत घराबाहेर असलेल्या गौरी गुरुनाथ खडके या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिला फरफटत नेले होते. उपचाराअंती ती बालिका ठार झाली. या घटनेने प्रशासन यंत्रणा व वनविभाग खडबडून जागे झाले असून, त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी कर्मचारी गस्तीवर आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर काननवाडी शिवारात पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन महिन्यांपूर्वीही याच गावात आजीसोबत घराकडे परतणाऱ्या बालिकेवरही बिबट्याने हल्ला करून शिकार केली होती. त्याचबरोबर एका व्यक्तीवरही बिबट्याने झडप घातली होती. त्यात तो जखमी झाला होता. जंगल परिसर असल्याने बिबट्यांचा नेहमीच वावर असल्याची माहिती ग्रामस्थांकडून दिली जात आहे. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. बिबट्यांना वनविभागाने जेरबंद करावे व हा परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (२४ घोटी बिबट्या)
===Photopath===
240621\24nsk_33_24062021_13.jpg
===Caption===
२४ घाेटी बिबट्या