बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरू ठार

By admin | Published: July 8, 2017 12:23 AM2017-07-08T00:23:25+5:302017-07-08T00:23:39+5:30

निफाड : तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरु ठार झाल्याची घटना घडली.

Two calf killers in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरू ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरू ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरु ठार झाल्याची घटना घडली. म्हाळसाकोरे ते कोमलवाडी रस्त्यालगत भरत गणपत मुरकुटे आणि सोमनाथ सखाहरी पडोळ हे शेतात वस्ती करून राहतात . मुरकुटे आणि पडोळ यांच्या वस्त्यांमध्ये १५९ ते २०० फुटांचे अंतर आहे. दोघांच्याही घराजवळ असलेल्या शेडमध्ये गायी व वासरे बांधलेले होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रथम मुरकुटे यांच्या शेडमधील वासरांवर हल्ला करून त्यास ठार करून उसाच्या शेतात नेले. नंतर पडोळ यांच्या शेडमधील वासराचा फडशा पाडला.

Web Title: Two calf killers in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.