मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:57 AM2018-02-22T00:57:01+5:302018-02-22T00:57:19+5:30
तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा,
Next
कळवण : तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची
नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मोकभणगीचे सरपंच प्रकाश पवार, लोटन गांगुर्डे व परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मोकभणगी येथे दोन
बछडे आढळून आले. येथील शेतकºयांनी व गावातील काही युवकांनी कळवण येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून दोन बछडे वनविभागाच्या ताब्यात दिले. अनेक शेतकरी बांधवांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे शेतकºयांनी सांगितले.