बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:53+5:302021-09-16T04:18:53+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराच्या गळ्याला नख लागले असून, सकाळी जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून त्यावर उपचार करण्यात आले. सध्या परिसरात ऊसाबरोबरच ...
बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराच्या गळ्याला नख लागले असून, सकाळी जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून त्यावर उपचार करण्यात आले.
सध्या परिसरात ऊसाबरोबरच मका, बाजरी पिकांची वाढ झाली असून, त्यामुळे बिबट्याला गायब होण्यासाठी सोयीचे वातावरण आहे; मात्र त्यात परिसरातील सर्व शेतकरी भीतीपोटी पिकांना पाणी भरण्यासाठी जाताना खूप घाबरत आहेत. गेल्या आठ दहा दिवसात बिबट्याने दौलत अहिरे, दीपक जगन्नाथ खरे यांच्या शेतातील एक एक बोकड फस्त केले आहे. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने त्यामुळे परिसरात आता पिंजरा लावला असून, पिकांमुळे बिबट्या सापडणे अवघड झाले आहे. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी देवकाते यांनी भेट देऊन पाहणी केली. वन विभागाने लवकरच या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------------------
ब्राह्मणगाव परिसरात वन विभागाने लावला पिंजरा. (१५ ब्राह्मणगाव)
150921\15nsk_14_15092021_13.jpg
१५ ब्राह्मणगाव