नंदिनी नदीतून काढला दोन गाडी कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:15+5:302021-06-10T04:11:15+5:30
भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकतेच नंदिनी नदीच्या संवर्धनासाठी आरोग्य मानवी साखळी मोहीम राबविल्यानंतर आता महापालिका आयुक्त यांनी आदेशित केल्याप्रमाणे ...
भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकतेच नंदिनी नदीच्या संवर्धनासाठी आरोग्य मानवी साखळी मोहीम राबविल्यानंतर आता महापालिका आयुक्त यांनी आदेशित केल्याप्रमाणे बुधवारी सिडको विभागाअंतर्गत नंदिनी नदीतील पात्राची साफसफाई करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सदर मोहिमेमध्ये सिडको विभाग व पश्चिम विभागाचे कर्मचारी तसेच संचालक घनकचरा विभाग डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक विनोद बोरीचा, आवारे, पश्चिम विभागाचे स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे, राजू गायकवाड, दिलीप चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट==
गोठेधारकांवर दंडात्मक कारवाई
महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागाच्या वतीने उंटवाडी परिसरात मोकळ्या जागेत असलेल्या गोठेधारकाने परिसरात अस्वच्छता ठेवल्याने गोठेधारकांवर पाच हजार रुपयाचा दंड करण्यात आला असल्याचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी सांगितले.
(फोटो ०९ नंदिनी) = नंदिनी नदीत स्वच्छता मोहीम राबवताना मनपा स्वच्छता कर्मचारी समवेत कल्पना कुटे, डॉ. मयुर पाटील, संजय गांगुर्डे आदी.