एबीबी सर्कलवर दोन मोटारींची धडक; मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:49 AM2022-04-18T01:49:57+5:302022-04-18T01:51:14+5:30

शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास दोन भरधाव मोटारींची धडक होऊन एका पाचवर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Two cars hit on ABB circle; The boy was killed | एबीबी सर्कलवर दोन मोटारींची धडक; मुलगा ठार

एबीबी सर्कलवर दोन मोटारींची धडक; मुलगा ठार

googlenewsNext
ठळक मुद्देसात जखमी : एबीबी सिग्नलवर मध्यरात्री घडला अपघात

नाशिक : शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास दोन भरधाव मोटारींची धडक होऊन एका पाचवर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मृत मुलगा व जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नव्हती. महिंद्रा झायलो कार (एमएच १५ डीसी ९७४६) व मारुती ब्रिझा (एमएच १५ जीएल ३४६१) या दोन्ही मोटारींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, चौकाच्या मधोमध दोन्ही मोटारी उलटल्या आणि त्यामधील प्रवासी बाहेर फेकले गेले. जखमींमध्ये चार महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस, तसेच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने घटनास्थळावरून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींमध्ये काहींच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षामध्ये उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Two cars hit on ABB circle; The boy was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.