नाशकात विवाहितेकडून हुंडा मागण्याची दोन प्रकरणे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:51 PM2019-03-16T15:51:51+5:302019-03-16T15:55:36+5:30

नाशिक शहरातील पंचवटी  व  गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५)  उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनांची पोलीस चौकशी करीत आहेत. 

Two cases of marriage demand for dowry in marriage are revealed | नाशकात विवाहितेकडून हुंडा मागण्याची दोन प्रकरणे उघड

नाशकात विवाहितेकडून हुंडा मागण्याची दोन प्रकरणे उघड

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक शहरात हुंडा मागण्याचे दोन प्रकरणे उघडगंगापूररोड परिसरात पतीने केली साडेसहा लाखांची मागणी नाशिकरोडला पतीकडून पत्नीकडे 50 हजार रुपयांची मागणी

नाशिक : शहरातील पंचवटी  व  गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५)  उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनांची पोलीस चौकशी करीत आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड भागातील भगवती सोसायटीत राहणाºया संशयित आरोपी प्रथमेश प्रकाश आमले (२८) याने ५ मे २०१६ पासून ते १५ मार्च २०१९ या कालावधीत पत्नीकडे आपल्याला वेगळे राहायचे असेल तर माहेरुन ५० हजार रुपये आण, अशी पैशाची मागणी केली. परंतु अरोपीची पत्नीने त्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे पिडितेचा आरोपी पती प्रथमेश आमले यांच्यासह सासू  हेमलता प्रकाश आमले,  सासरे प्रकाश निवृत्ती आमले,  व सर्वेश प्रकाश आमले यांनी जवळपास चारवर्षे फिर्यादीला शिवीराळ करतानाच शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर विवाहितेने तिच्या सासरच्यांच्या जाचाला कंटाळुन पंचवटी पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून आमले कुटंबियांनावर गुन्हा दाखल करण्यात अला असून या प्रकरणी पोलीस, उपनिरीक्षक जी.एम. जाधव पुढील तपास करीत आहेत. तर दुसरी घटना गंगापूररोड भागातील तेजप्रभानगर भागात घडली आहे. या प्रकरणात तेजप्रभानगरमधील मानसी अपार्टमेंट येथील रु पेश धनंजय कुलकर्णी  याने आपल्या पत्नीकडे नवीन व्यावसाय सुरू करण्यासाठी माहेराहून साडेसहालाख रुपये आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकून तिला शिवाराळ केली. तसेच हाताच्या चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून दमही भरला. फिर्यादीने पतीची मागणी पूर्ण न केल्याने आरोपी रुपेश कुलकणी याने फिर्यादीचे स्त्रीधनाचे दागिने काढून घेत तिचा मानसिक व शारिरिक छळही केला. याप्रकणी रुपेशच्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रक रणाची चौकशी करीत आहे. 

Web Title: Two cases of marriage demand for dowry in marriage are revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.