बिबट्याच्या हल्ल्यात भाऊ-बहिण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 01:36 PM2020-03-29T13:36:31+5:302020-03-29T13:36:59+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील घोडेवाडी शिवारात कै.बंडू धादवड यांच्या झापवस्तीवर कु.विजय बंडू धादवड (११) , आणि मोनिका बंडू धादवड (१५) ही दोनही मुले शेतातील बांधावरून झापवस्तीतील घराकडे येत असतांना या दोन मुलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला.
नांदूरवैद्य :टाकेद परिसरातील घोडेवाडी शिवारात बिबटय़ाच्या हल्लयात कु.विजय बंडू धादवड (11) ,आणि मोनिका बंडू धादवड (15) हे दोघेही भाऊ-बहिण जखमी झाले आहेत. दरम्यान बिबट्याने हल्ला केला त्यावेळी दोनही मुलांनी जोरदार आरडा ओरडा देत किंचाळी फोडली. या मुलांच्या जोरदार आरडा ओरडा आवाजाने बिबट्याने घटनास्थळावरून लगेचच जंगलाच्या दिशेने पोबारा केला.बिबट्याच्या या भयानक हल्ल्यात विजय आणि मोनिका ही दोघेही बहीण-भाऊ जखमी झाले. घोडेवाडी शिवारातील या धादवड वस्तीतील झाप वस्तीतील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोनही मुलांना तात्काळ धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. या दोनही मुलांवर तात्काळ उपचार करण्यात आले. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून या हरिओमनगर घोडेवाडी शिवारात बिबट्याचा कायम वावर असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने मुलांवर केलेला हल्ला व बिबट्याची परिसरात असलेली दहशत लक्ष्यात घेता घोडेवाडी येथील शेतकरी तथा टाकेद ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ घोडे यांनी ही माहिती तात्काळ वनविभाला कळविली या परिस्थितिची वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी गांभीर्याने दखल घेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले व तात्काळ पिंजरा लावण्यास सांगितले. वनरक्षक रेश्मा पाठक यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन वनरक्षक एस.के. बोडके, मालती पाडवे यांना बरोबर घेत वनमजुर आर.डी.बगड, दशरथ निर्गुडे, गोविंद बेंडकोळी, भोरु धोंगडे, धोंडीराम पेढेकर, मुरलीधर निरगुडे, भरत धोंगडे या कर्मचार्यांच्या मदतीने सदर घटनास्थळी बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात आला.