आपल्याच निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्विकारणारे बांधकाम विभागातील दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 08:09 PM2021-09-23T20:09:08+5:302021-09-23T20:13:19+5:30

निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांना १० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यात मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांचा समावेश असून त्यांना निवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाल्या बिलासह अन्य बिलांचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) सापळा रचून पकडले आहे.

Two clerks in the construction department who accept bribes from their own retired colleagues are caught by the ACB | आपल्याच निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्विकारणारे बांधकाम विभागातील दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात

आपल्याच निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्विकारणारे बांधकाम विभागातील दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम विभागातील दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यातनिवृत्त सहकारीकडून केली लाचेची मागणीदहा हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने पकडले

नाशिक : आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांना १० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यात मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांचा समावेश असून त्यांना निवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाल्या बिलासह अन्य बिलांचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) सापळा रचून पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम विभागातून ३० जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहे. त्यांचे सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाचे बील यासह इतर बिलांचे काम करून देण्यासाठी मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांनी त्यांच्याकडून १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक निभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीने पूर्वचौकशी करून सापळा रचून मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांना गुरुवारी लाचेची रक्कम स्विकारताना पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सतीश भामरे यांनी दिली आहे. दरम्यान, आपल्याच पूर्व सहकाऱ्यांकडून अशाप्रकारे लाचेची मागणी करून स्विकारण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शासकीय यंत्रणेतील बोकाळलेला भ्रष्टाचाप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Two clerks in the construction department who accept bribes from their own retired colleagues are caught by the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.