धुमाळ पॉईंटवरील कपड्यांच्या दोन दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:10+5:302021-05-17T04:13:10+5:30

नाशिक : मेनरोडवरील धुमाळ पॉईंट येथील ‘राजेशाही गारमेंटस्’ व ‘महालक्ष्मी गारमेंट’ या रेडिमेंट गारमेंटच्या दुकानांना अचानक लागलेल्या आगीत ...

Two clothing stores on Dhumal Point caught fire | धुमाळ पॉईंटवरील कपड्यांच्या दोन दुकानांना आग

धुमाळ पॉईंटवरील कपड्यांच्या दोन दुकानांना आग

Next

नाशिक : मेनरोडवरील धुमाळ पॉईंट येथील ‘राजेशाही गारमेंटस्’ व ‘महालक्ष्मी गारमेंट’ या रेडिमेंट गारमेंटच्या दुकानांना अचानक लागलेल्या आगीत सुमारे सहा ते सात लाख रुपयांच्या कपड्यांसह कटलरी मालाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मुख्यालय तसेच शिगांडा तलाव येथील मुख्यालयासह पंचवटी केंद्राच्या पथकाने बंबासह घटनास्थळी धाव घेत जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. त्यामुळे इमारत तसेच इतर दुकानांचे आगीपासून होणारे संभाव्य नुकसान टळले.

धुमाळ पॉईंटवरील राजेशाही गारमेंटस्, महालक्ष्मी गारमेंट्स, सुरेखा क्लॉथ स्टोअर्स, माझदा केक शॉप यासह इतर दुकाने आहेत. लॉकडाऊनमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास निखिल जाधव यांच्या 'राजेशाही गारमेंटस्' या दुकानातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. या दुकानांमध्ये तयार कपड्यांचा साठा होता. त्यामुळे आग झपाट्याने पसरू लागल्याने त्यामुळे इतर दुकानांना धोका निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून जमलेल्या नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात शिंगाडा तलाव येथील अग्निशामक दल मुख्यालयातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचवटी केंद्राचे पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही बंबांनी सुमारे तासभराच्या कालवाधील आगीवर नियंत्रण मिळविल्याने परिसरातील इतर दुकांनाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य झाले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दालच्या शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातील लिडिंग फायरमन अर्जुन पोरजे, वाहन चालक गणेश

गायधनी, फायरमन राजेंद्र पवार, उदय शिर्के, विजय शिंदे, अनिल गांगुर्डे तसेच पंचवटी केंद्राचे लिडिंग फायरमन एस.जी. मतवाड, ए. पी. सरोदे, फायरमन एन. पी. म्हसके, एम. एस. पिंपळे, एस. डी .भालेराव, एस. एच. माळी यांनी शर्तीचे प्रयत्न केले.

===Photopath===

160521\16nsk_13_16052021_13.jpg

===Caption===

धुमाळ पॉइंट येथील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने असे धुराचे लोट दिसत होते. 

Web Title: Two clothing stores on Dhumal Point caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.