मनमाडला मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:48 AM2021-12-09T01:48:31+5:302021-12-09T01:48:42+5:30

मनमाड येथील जंक्शन रेल्वे स्थानकात बुधवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास रेल्वे यार्डात परीक्षणासाठी जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मनमाड-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली. रेल्वेच्या यातायात पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, मुंबई - भुसावळ मार्गावरील वाहतुकीवर या अपघाताचा कोणताही परिणाम झाला नाही.

Two coaches of Manmadla derailed | मनमाडला मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले

मालगाडीचे रुळावरून घसरलेले डबे

Next
ठळक मुद्देवाहतूक ठप्प : युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती

नाशिक : मनमाड येथील जंक्शन रेल्वे स्थानकात बुधवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास रेल्वे यार्डात परीक्षणासाठी जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मनमाड-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली. रेल्वेच्या यातायात पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, मुंबई - भुसावळ मार्गावरील वाहतुकीवर या अपघाताचा कोणताही परिणाम झाला नाही.

 

बुधवारी सकाळच्या सुमारास एनएमजी मालवाहतूक करणारी गाडी मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार आणि पाच यामध्ये असलेल्या रुळावरून रेल्वे यार्डात परीक्षणासाठी जात होती. इंदोर - पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रीजच्या खाली या गाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालगाडीच्या एका बोगीचे चाके निखळली आणि गाडी जागीच थांबली. या घटनेने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, याच वेळी जालना - मनमाड - दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही मनमाडकडे येण्याच्या बेतामध्ये असतानाच हा अपघात झाल्याने जनशताब्दी एक्सप्रेस अंकाई रेल्वे स्थानकात तब्बल दीड तास खोळंबली, तर मनमाड रेल्वे स्थानकात फलाटावर पुणे -मनमाड - निजामाबाद मेमो पॅसेंजरदेखील दीड तास खोळंबली होती.

 

Web Title: Two coaches of Manmadla derailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.