पंचवटीत विषारी औषध घेऊन दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:02+5:302021-09-22T04:18:02+5:30
पंचवटी : परिसरात राहणाऱ्या दोघांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात ...
पंचवटी : परिसरात राहणाऱ्या दोघांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये ४७ वर्षीय इसमाचा व एका २० वर्षीय युवकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येची पहिली घटना मखमलाबाद रोड भागात रुक्मिणी अपार्टमेंट येथे घडली आहे. या घटनेत सुदाम किसन ताकाडे यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना रामवाडी परिसरातील लक्षरंग अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेत अमित संजय डामसे या युवकाने घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही प्रकरणांमध्ये आत्महत्येचे कारण अद्याप समोर येऊ शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,