शिक्षक सहकारी संस्थेचे दोन लाचखोर व्यवस्थापक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:11 PM2020-06-10T17:11:15+5:302020-06-10T17:15:04+5:30

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी वेतनाचा फरक व नियमीत पगार काढण्यासाठी सोसायटीत मागणी केली.

Two corrupt managers of teachers' co-operative society arrested | शिक्षक सहकारी संस्थेचे दोन लाचखोर व्यवस्थापक ताब्यात

शिक्षक सहकारी संस्थेचे दोन लाचखोर व्यवस्थापक ताब्यात

Next
ठळक मुद्देवेतनाचा फरक व नियमीत पगार काढण्यासाठी मागणीशरद वामनराव जाधव, व्यवस्थापक जयप्रकाश रघुनाथ कुवर अशी संशयित लाचखोरांची नावे

नाशिक : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी व नियमीत पगार देण्याच्या मोबदल्यात १९ हजार ७१५ रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. नाशिक डिस्ट्रीक्ट सेकेंडरी टिचर्स -नॉन टिचिंग को-ऑप सोसायटीचे शाखा व्यवस्थापक शरद वामनराव जाधव आणि व्यवस्थापक जयप्रकाश रघुनाथ कुवर अशी दोघा संशयित लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी वेतनाचा फरक व नियमीत पगार काढण्यासाठी सोसायटीत मागणी केली. मात्र शाखा व्यवस्थापक जाधव व व्यवस्थापक कुवर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. त्यात बुधवारी (दि.१०) शरद जाधव यांनी सोसायटीच्या कार्यालयात तक्रारदाराकडून स्विकारली. त्यानुसार विभागाने दोघांनाही पकडले.

 

Web Title: Two corrupt managers of teachers' co-operative society arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.