द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 07:01 PM2019-12-07T19:01:24+5:302019-12-07T19:02:34+5:30
दिंडोरी : तालुक्यातील पालखेड शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २ कोटींची फसवणूक झाली असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये राजकोट येथील द्राक्ष निर्यातदार विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी दिंडोरी तालुक्यातल्या पालखेड शिवारातील सुनिल चंद्रभान गायकवाड व इतर १७ द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी आपली निर्यातक्षम द्राक्ष हे गुजरात मधील राजकोट येथील व्यापाºयांना विक्र ी केले होते. या शेतकºयानी आपली द्राक्ष क्र ाउन इंटरनॅशनल एक्सपोर्ट इम्पोर्ट यांचे संचालक यांना विक्र ी केली.
संशयीत आरोपी वर्षा जस्मिन साविलया आणि दोन इतर व्यक्ती (रा. राजकोट) यांना शेतकºयांचे ३९ लाख ९४ हजार ७६० आणि इतर सर्व एक कोटी ९८ लाख ७४ हजार ६६० रु पयांची फसवणूक केली. सर्व शेतकºयांचा विश्वास संपादक करून यात १७ शेतकºयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये सदर कंपनीच्या विरोधात व तीन लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकारामुळे द्राक्ष बागातदार शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.