दोन कोटी रोपांची होणार लागवड

By Admin | Published: June 14, 2016 10:56 PM2016-06-14T22:56:16+5:302016-06-14T23:57:57+5:30

वनविभाग : १ जुलै रोजीच्या कार्यक्र मासाठी कळवण तालुका सज्ज

Two crore plants will be planted | दोन कोटी रोपांची होणार लागवड

दोन कोटी रोपांची होणार लागवड

googlenewsNext

कळवण : बिघडलेल्या पर्यावरणाचा दुष्परिणाम लक्षात घेऊन संपूर्ण राज्यभरात १ जुलै रोजी राज्य शासनाच्या वनविभागाकडून दोन कोटी वृक्षलागवडीसाठीचा संकल्प करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. कळवण व कनाशी वनपरिक्षेत्र कार्यकक्षेत नियोजन करण्यात आले असून, वृक्षलागवडीसाठी कळवण तालुक्यातील वनविभाग सज्ज असल्याची माहिती कनाशी वनपरिक्षेत्र विभागाचे वनाधिकारी अमोल आढे यांनी दिली.
वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त लोकसहभाग कसा वाढेल यासाठी शासन यंत्रणा व विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. याबाबत राज्याचे वित्त
आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व वनविभागाच्या यंत्रणेला सूचना करून लोकसहभागातून जास्तीत जास्त
वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले आहे.
वनविभागातील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसाची माहिती किती झाडे लावण्यात आली त्याची संख्या मिळविण्यासाठी मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक वनरक्षकाला आपल्या झाडांची संख्या नोंदवता येणार आहे. त्यांचे मोबाइल नंबर नोंदणी म्हणून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. वेळेत वृक्ष लागवड करण्यासाठी विशेष बक्षिसे वनविभागामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती कनाशीचे वनअधिकारी अमोल आढे व कळवणचे वनरक्षक अनिल गुंजाळ यांनी दिली.
वनलागवड कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसिकता, वैचारिक बदलांची आवश्यकता असून, या उपक्रमात कळवण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार व स्वयंसेवी संस्थांनी व नागरिकांनीदेखील सहभाग नोंदवावा, असे आवाहन कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन. आडे, वनपाल वैभव हिरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Two crore plants will be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.