साहित्य खरेदीसाठी केला दोन कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:43 PM2020-06-17T21:43:03+5:302020-06-18T00:26:05+5:30
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य केंद्रांमध्ये असलेली अपुरी व्यवस्था पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही व्यवस्था बळकट करण्यासाठी मदतीचा हातभार लागला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी करून त्याचे वाटप केले असून, काही लोकप्रतिनिधींनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांना निधी दिला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेची आरोग्यव्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून चालत असताना ग्रामीण भागातील जनतेला प्राथमिक उपचार व महिलांचे बाळंतपण यासारख्या सुविधा पुरविली जाते. मात्र कोरोनासारख्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या साहित्याचा व उपकरणांचा आरोग्य केंद्रांना आजवर कधी गरज पडली नाही. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील जनतेचा त्यापासून बचाव करण्यासाठी ही साधनसामग्रीची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील सात लोकप्रतिनिधींनी आपल्या विकासनिधीतील रक्कम आरोग्य साधने खरेदीसाठी थेट जिल्हा परिषदेच्या स्वाधीन केली.
जिल्हा परिषदेला सुमारे दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिला असून, त्यातून खरेदी केलेली साधने आपापल्या मतदारसंघातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे. त्यात विशेष करून हायड्रोक्लोराईड, थ्री लेअर मास्क, पीईपी किट््स यांसारख्या कोरोना प्रतिबंधात्मक साधनांबरोबरच, काही लोकप्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पलंग, चादर, बेडशिट््स अशा आवश्यक व कायमस्वरूपी लागणाºया वस्तू पुरविल्या आहेत.
---------------------
स्थानिक पातळीवर सूचना
मुळातच राज्य सरकारने व आरोग्य विभागानेदेखील लोकप्रतिनिधींच्या निधीतून आरोग्यव्यवस्था बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीची खरेदी करण्यात यावी, अशा सूचना स्थानिक पातळीवर दिल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्य उपकरणांची खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले असताना, आपत्ती व्यवस्थापनांतर्गतदेखील जिल्हा परिषदेला वीस लाख रुपये कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यासाठी देण्यात आले आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र निधी नसला तरी, लोकप्रतिनिधींनी मोठी मदत केली आहे. त्यांच्या मदतीतून त्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास हातभार लागला आहे. लवकरच साथरोग नियंत्रण व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना लागणाºया औषधांचीही खरेदी करण्यात येणार आहे.
- डॉ. कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी