पिंपळगाव येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:42 PM2018-03-01T23:42:13+5:302018-03-01T23:42:13+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप बुधवारी झाला.
पिंपळगाव बसवंत : येथील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप बुधवारी झाला. शहरातील प्रमिला लॉन्स येथे सकाळी ८ वाजता नागपूर येथील भन्ते तिस्सबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच नंदू गांगुर्डे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भन्ते आनंद महाथेरो होते. याप्रसंगी बोलताना भन्ते आनंद महाथेरो म्हणाले, समाजात जाती कुठून आल्या? जातिपातीच्या राजकारणात न गुंतता समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. समाजाची खुंटलेली प्रगती साधण्यासाठी समाजबांधवानी जातिपाती विसरत न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ़ बाबासाहेबांचा आदर्श घेऊन चांगले कर्म केल्यास लोक आपोआपच आपल्या मागे येतात त्यामुळे वाईट मार्गाकडे न जाता चांगल्या कर्माकडे वळा, असे आवाहनही त्यांनी केले. दोन दिवसीय धम्म परिषद दोन सत्रात उत्साहात पार पडली. पहिल्या सत्रात विविध भिक्खूंची व्याख्याने झाली. दुसºया सत्रात नागपूर येथील सिनेकलाकार अंजली भारती यांचा भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भारत गांगुर्डे , महेंद्र साळवे, राजा गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, योगेश गांगुर्डे , दिलीप बनकर , गोरख गांगुर्डे, संतोष लोढे आदींसह नागरिक उपस्थित होते.