वृक्षांवरील फलक हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:35 AM2019-03-15T01:35:35+5:302019-03-15T01:36:07+5:30
व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करून त्यावर फलक लावणाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर महापालिकेलाही आता जागृत झाली असून, अशाप्रकारे कारवाई करणाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा फलक लावणाऱ्यांचे फलक जप्त करण्याबरोबरच आता फौजदारी करवाईदेखील करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फलक हटविण्यासाठी या व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नाशिक : व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करून त्यावर फलक लावणाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर महापालिकेलाही आता जागृत झाली असून, अशाप्रकारे कारवाई करणाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा फलक लावणाऱ्यांचे फलक जप्त करण्याबरोबरच आता फौजदारी करवाईदेखील करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फलक हटविण्यासाठी या व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
शहरात फलक बाजांचे पेव फुटले असून, सार्वजनिक आणि खासगी मिळकतींवर फलक लावले जातातच, परंतु झाडांवरदेखील फलक लावले जातात केवळ झाडावर फलक टांगण्यासाठी बरोबरच झाडांना खिळे ठोकून झाडांना जखमी केले जाते. हजारो झाडावर अशाप्रकारे फलक लावून ते जायबंदी केले जात असताना महापालिका आणि पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्ष असते. त्यासंदर्भात लोकमतने गेल्या दि. २५ फेब्रुवारीस ‘व्यवसायाच्या वाढीची हाव, झाडांवर घाव’ या विशेष पानात महापालिकेच्या दुर्लक्षाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मानव उत्थान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हून अशाप्रकरचे फलक हटविले होते, तर महापालिकेने काही व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र गुरुवारी (दि.१४) महापालिकेने अशाप्रकारच्या जाहिरात करणाºयांना तंबी दिली आहे.
महानगरपालिकेने जाहिराती लावण्यास विविध जागा, अटी-शर्ती व नियम ठरवून दिलेले आहेत, सदर नियमांचे पालन करून मनपाची रितसर पूर्वपरवानगी घेऊनच जाहिराती, बोर्ड व फलक उभारणे आवश्यक असतानाही अशा प्रकारच्या परवानगी घेतल्याचे आढळून येत नाही.
त्यामुळे नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी अशाप्रकारे विनापरवानगी, अनधिकृतपणे जाहिराती, बोर्ड, फलक लावणाºया संबंधित नागरिक, व्यावसायिक, रहिवासी व दुकानदार यांनी आपापल्या जाहिराती, बोर्ड, फलक इत्यादी हे तत्काळ दोन दिवसांचे आत स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा तद्नंतर मनपामार्फत सदरचे बोर्ड, जाहिराती, फलक हे जप्त करण्यात येतील व संबंधितांविरु द्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींप्रमाणे व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डिफेंसमेंट आॅफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५चे तरतुदी अन्वये पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी तंबी महापालिकेने दिली आहे. नागरीकांनी वृक्षांवर जाहिरात करणाºयांबाबत विभागीय कार्यालय किंवा महापालिकेच्या अॅपवर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्षांवर रोषणाईला मनाई
मनपाच्या उद्यान विभागाने वृक्षांवर जाहिरात फलकच नव्हे तर विद्युत रोषणाई करण्यास देखील मनाई केली आहे. शहराच्या अनेक भागात हॉटेल व्यावसायिक रोषणाई करतात किंवा झाडांना तारा बांधतात, त्या काढून घेण्याचे निर्देश दिले असून संबंधीतांच्या विरोधात आर्थिक दंड आणि अन्य कारवाई करणार आहे़