दोन दिवसात २४ जण परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:41 PM2020-07-03T22:41:59+5:302020-07-04T00:37:01+5:30
एकीकडे कोरोना-बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे मार्गदर्शन, आरोग्यसेवकांची मेहनत, वेळच्या वेळी आहार आणि योग्य उपचार यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनातून मुक्त होत आहेत. गुरुवारी तब्बल १४, तर शुक्रवारी १० जणांनी कोरोनावर मात करून परतले. त्यामुळे १४४ रुग्णांपैकी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ७७ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी १२ कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोबाधितांची संख्या १४४ झाली आहे.
सिन्नर : तालुक्यात एकीकडे कोरोना-बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे मार्गदर्शन, आरोग्यसेवकांची मेहनत, वेळच्या वेळी आहार आणि योग्य उपचार यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनातून मुक्त होत आहेत. गुरुवारी तब्बल १४, तर शुक्रवारी १० जणांनी कोरोनावर मात करून परतले. त्यामुळे १४४ रुग्णांपैकी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ७७ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी १२ कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोबाधितांची संख्या १४४ झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी ११६ रुग्णसंख्या होती. तथापि, तालुक्यातील चास, वडगाव पिंगळा व मोह येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असणाºया रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर शिवडे येथील ८५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १२०वर पोहचली आहे.
गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी शहरातील रेणुकानगर तसेच ठाणगाव येथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आरोग्य यंत्रणेने उपाययोजना सुरू केल्याने बाधितांची संख्या वाढली असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.