ब्राह्मणगावला दोन दिवसाचा लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:04 AM2021-04-04T00:04:46+5:302021-04-04T00:28:25+5:30

ब्राह्मणगाव : येथे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शनिवार, रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी सांगितले. कोरोना साखळी तुटावी म्हणून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Two days lock down to Brahmangaon | ब्राह्मणगावला दोन दिवसाचा लॉक डाऊन

ब्राह्मणगावला दोन दिवसाचा लॉक डाऊन

googlenewsNext
ठळक मुद्देकारोना : उन्हाची तीव्रता वाढल्याने रस्ते ही निर्मनुष्य

ब्राह्मणगाव : येथे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शनिवार, रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी सांगितले. कोरोना साखळी तुटावी म्हणून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गावात कोरोनाचे एकूण ३० रुग्ण संख्या होऊन त्यात एक ५ वर्ष व १ एक ३ वर्षीय लहान मुले ही कोरोना ग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे. त्यातच एक ६२ वर्षीय रुग्ण दगावला असून गावात शनिवार व रविवारी दोन दिवस पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंचअहिरे यांनी दिली.
शनिवार व रविवार दोन दिवस मेडिकल, दूध वगळता सर्व व्यवसायिक दुकाने बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत औषध फवारणी करण्यात येत असून गावातील पडीत जागेवरील पालापाचोळा, अनावश्यक झाडे यांची साफसफाई करण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्टिंग करण्यात येत असून कोरोना रुग्ण आढळलेल्या घरावर आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका व आशा कार्यकर्त्या यांचे मार्फत दरवाजावर नोटीसा लाऊन प्रत्येक घरातील पाणी साठवलेल्या टाक्या तपासण्यात येऊन स्वच्छते बाबत सूचना देण्यात येत आहेत.
गावात सद्या एकूण २८ रुग्ण संख्या असून आतापर्यंत एकूण १२०० व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान गावातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क आवश्यक लावावा अन्यथा ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाईचा इशारा ग्रामविकास अधिकारी बी. एन. ठोके यांनी दिला आहे.

(०३ ब्राह्मणगाव)

ब्राह्मणगाव येथे ग्रामपंचायतीकडून गावात बंदचे आवाहन करताना सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे, सदस्य विनोद अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत कदम, अहिरे,मालपाणी आदी.

Web Title: Two days lock down to Brahmangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.