वालदेवी नदीत बुडून सिडकोतील दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:00 AM2018-04-03T02:00:33+5:302018-04-03T02:00:33+5:30
नांदूरवैद्य : मुंबई महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी सिडकोतील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. रायगडनगर जवळील वालदेवी नदीपात्रात रविवारी दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या अनिल बाळू सुतार आणि सागर दिलीप नेरे (दोघे वय २७, रा. पंडितनगर, सिडको) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्यामुळे प्राण गमवावे लागला. रात्री अंधार झाल्यामुळे आणि वाढत्या पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्यामुळे नेरे याचा मृतदेह सापडण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी प्रयत्न केले, परंतु दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू केल्यानंतर उशिरा त्याचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या नांदगाव बुद्रुक येथील तीन जीवनरक्षकांचे मृतदेहाचे शोधून काढले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वाडीव-हे पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य केले. ईबरान शेख व भरत वाघमारे अशी वाचलेल्या दोघांची नावे आहेत. सागर नेरे याच्या पश्चात दोन बहिणी, आई, वडील असा परिवार आहे.