इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:33 AM2019-03-27T00:33:03+5:302019-03-27T00:33:29+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पहिल्या घटनेत मेट्रो झोन गृहप्रकल्पाच्या पाठीमागे असलेल्या काळे यांच्या शेतातील विहिरीत जवळच राहणाऱ्या किरण राजू मोरे (३४) यांचा मृतदेह त्यांचा भाऊ किशोर मोरे यांना तरंगत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनेची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविली. मयत किरण हा मागील दोन दिवसांपासून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला होता. दुसऱ्या घटनेत पाथर्डीगावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या भंडुबरा नावाच्या विहिरीत सीताबाई मुरलीधर गवळी (८०) या वृध्देचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
सीताबाई यांना स्मृतिभं्रशचा आजार होता. मारुती मंदिराजवळ पाथर्डीगावात त्या राहात होत्या. आजारामुळे त्यांनी विहिरीत उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या प्रकरणी वैशाली शिंदे यांनी पोलिसांना घटनेची खबर दिली.