धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:35 AM2019-10-05T00:35:45+5:302019-10-05T00:36:37+5:30
येवला तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत.
येवला : तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत.
गावातील ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता गावाच्या पूर्वेला असलेल्या तळ्यासारख्या खड्ड्याजवळ त्यांच्या चपला व कपडे आढळून आले. मुलांचा तपास लागलेला नसल्याने मुले कदाचित तळ्यात बुडाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. तळ्यात पोहण्यासाठी उतरल्याची चर्चा आहे.
पोलीसपाटील संदीप कांबळे यांनी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अंधार असल्याने तळ्यात गाळ असू शकतो, त्यामुळे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य परत सुरू केले असता दोन्ही मुलांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारल्याचा अवस्थेत मिळून आले. दोघांचे मृतदेह पाण्यातून काढण्यात आले. येथील शासकीय रु ग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दोन्हीही मुलांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, काशीनाथ कांबळे यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला असून, मुले मजुरी करून बकºया सांभाळून गुजराण करत आहेत.
दोघांचे मृतदेह बाहेर काढले असता दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती, एका मुलाला पोहता येत होते व दुसºयाला वाचविताना दोघेही बुडाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. धानोरे येथे एका वेळेस दोन अंत्यविधी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गावात दु:ख वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कोळी करत आहे.