दोन आयशरची धडक; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:48+5:302020-12-25T04:12:48+5:30
--------------- कामगार शक्तीकडून नागरिकांना मदत सिन्नर : कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार आणि मित्र परिवाराकडून साईबाबानगर आणि परिसरात ...
---------------
कामगार शक्तीकडून नागरिकांना मदत
सिन्नर : कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार आणि मित्र परिवाराकडून साईबाबानगर आणि परिसरात ५ हजार सॅनिटायझर बॉटल आणि २५ हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत सरवार आणि मित्रपरिवाराने शहर आणि परिसरातील उपनगरांमध्ये घरोघरी जात मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. या उपक्रमात अनिल सरवार यांच्यासोबत नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक पंकज मोरे, रवींद्र गिरी, संदीप जाधव, संतोष गुजर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
-----------------
बिनविरोध ग्रामपंचायतींना मिळणार आरओ प्लांट अथवा घंटागाडी
सिन्नर : तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या बिगूल वाजला असून, निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार आरओ प्लांट किंवा ग्रामपंचायतीला गाव स्वच्छ करण्यासाठी घंटागाडीसाठी आवश्यक निधी दिला जाणार आहे. ज्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर संपूर्ण हरित ग्राम व स्वच्छ गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहून यशस्वी उपक्रम राबवतील त्या ग्रामपंचायतींना पन्नास लाख रुपये किंवा त्याहून अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
----------------
मुंबई मोर्चात प्रहारचे पदाधिकारी सहभागी
सिन्नर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धीरूभाई अंबानी यांच्या कार्यालयावर राज्यमंत्री तथा प्रहार संघटना पक्षप्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिन्नर येथून लक्झरी बस, इनोव्हा आदीं अनेक वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना झाले होते.
---------------
शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी
सिन्नर : शेतकरी विरोधी कायदा रद्द व्हावा यासाठी झालेल्या मोर्चात प्रहारचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर मुंबईत आंदोलन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी दिली. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे, रमाकांत उपाध्ये, नितीन गवळी, प्रशांत खैरनार व देवरे, दौलत धनगर, संदीप लोंढे, बापू सानप, नितीन अढांगळे, अर्जुन घोरपडे, सुनील महाराज आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी मोर्चात सहभागी झाले.