नाशिक जिल्ह्यात  दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:28 AM2019-06-20T01:28:56+5:302019-06-20T01:29:18+5:30

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम आहे. दिंडोरी, निफाड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले.

 Two farmers suicides in Nashik district | नाशिक जिल्ह्यात  दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक जिल्ह्यात  दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next

नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम आहे. दिंडोरी, निफाड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले.  दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील शेतकरी रामनाथ पोपट जाधव-वसाळ (५५) यांनी बुधवारी (दि.१९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास स्वत:च्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली
कर्जाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे.
रामनाथ जाधव हे अवनखेड येथील आपल्या मालकीच्या गट नं. १३८ या शेतात वास्तव्यास असून, अडीच ते तीन एकर क्षेत्र असणाºया शेतात आपला शेतीव्यवसाय करत होते. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालाला असणारा कवडीमोल भाव, बँकांचा, सहकारी संस्थांचा कर्जाचा डोंगर, बियाणे, खते, औषधे यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, द्राक्षांचे घसरलेले दर, शेतीच्या भरवशावर असणारे मुला-मुलींचे विवाह, आजारपण, सहकारी संस्थांकडून होणारा कर्जाचा तगादा या सर्व गोष्टींची सांगड घालताना आपल्या नाकीनव आल्याचे सांगत मी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे जाधव यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. जाधव यांच्यावर अंदाजे दहा लाख रुपये कर्ज असल्याने ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचे. त्यातच मंगळवारी त्यांना बँकेच्या वसुली विभागाची नोटीसदेखील मिळाली होती. उत्तरीय तपासणीनंतर ग्रामीण रु ग्णालय, दिंडोरी येथे शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे प्रभारी उपनिरीक्षक प्रवीण पाडवी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, योगेश भोये करत आहेत.

 

Web Title:  Two farmers suicides in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.