जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:11 AM2019-04-27T01:11:48+5:302019-04-27T01:12:18+5:30
नांदगाव तालुक्यातील साकोरा व मूळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व मूळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. शुक्र वारी सकाळी साकोरा येथील दत्तू एकनाथ बोरसे (४०) या युवा शेतकºयाने सततची नापिकी आणि तीन लाख रु पये उसनवार तसेच सोने तारण कर्जाला कंटाळून नाशिककडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मूळडोंगरी तांडा येथील रतन पूना चव्हाण (६५) या शेतकºयाने नापिकी जमीन आणि सुमारे वीस लाख रुपये खासगी कर्जाच्या ओझ्यामुळे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण यांच्या नावावरदेखील चार एकर शेतजमीन होती. दोन शेतकºयांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.