दोन मादी बिबटे आणि पाच बछड्यांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 05:28 PM2018-12-25T17:28:42+5:302018-12-25T17:29:54+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कोळगावमाळ शिवारात दोन मादी बिबट्यांसह पाच बछड्यांचा मुक्तपणे संचार सुरु असल्याने शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कोळगावमाळ शिवारात दोन मादी बिबट्यांसह पाच बछड्यांचा मुक्तपणे संचार सुरु असल्याने शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
कोळगावमाळ उजव्या कालवा परिसरातील चंद्रे वस्तीवरील शेतकरी सुरेश चंद्रे, गणेश काकड, सोमनाथ काकड हे संध्याकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना बिबट्या आणि साधारण एका आठवडे वयाची तीन बछडे दिसल्याचे या शेतकºयांनी सांगितले. मादी बिबट्या सध्या रानटी डुकरांची शिकार करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.दुसरा मादी बिबट्या वाल्मिक जुंधारे यांच्या वस्तीकडेही दिसून आला. त्याच्यासोबत तीन ते चार महिन्यांची दोन बछडे असल्याचे अनेकांनी पाहिले. दोन्ही ठिकाणी दिसून आलेल्या बछड्यांच्या वयात बदल दिसल्याचे शेतकºयांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मादी असावी असा शेतकºयांचा अंदाज आहे. मादी बिबटे व त्यांच्यासोबत बछडे असावे असा अनेकांचा अंदाज आहे. शेतात ही बछडे खेळायला येतात. त्यामुळे मादीही आसपास असण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी के. आर. इरकर आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची शेतकºयाबरोबर पाहणी केली. बिबट्याच्या पायाची ठसे उसाच्या आजूबाजूला दिसल्याने वनविभागाची खात्री झाली. वन अधिकाºयांनी संभाव्य धोके टाळावे यासाठी वाल्मिक जुंधारे यांच्या वस्ती जवळील उसाच्या कडेला बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. परंतु बिबट्या मात्र अजूनही मोकाट फिरत असल्याचे दिसते. चौकट- शेतकरी पाणी भरण्यासाठी जाण्यास धजावत नाहीपरिसरातील शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी भरण्यासाठी जात नाही. बाहेर कुणीही झोपत नाही. दिवसाही भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी, महिला, शेतमजूर, लहान मुले शेतात जाण्यास घाबरत आहे. वनाधिकाºयांनी शेतकºयांना परिसरात धूर, आवाज करून कामे करणे जेणेकरून बिबटे आणि त्यांची पिल्ले आसपास येणार नाही असा सल्ला दिला आहे.