नाशिक तालुक्यात दोन भरारी पथके

By admin | Published: January 23, 2017 11:05 PM2017-01-23T23:05:11+5:302017-01-23T23:05:34+5:30

आचारसंहिता : पोलिसांना समन्वयक

Two firing squad in Nashik taluka | नाशिक तालुक्यात दोन भरारी पथके

नाशिक तालुक्यात दोन भरारी पथके

Next

नाशिक : नाशिक तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन आचारसंहितेच्या पालनाविषयी सूचना दिल्या, तसेच समन्वयासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत चर्चा केली.  नाशिक तालुका पंचायत समितीचा विस्तार पाहता आठ पोलीस ठाण्यांचा त्यात समावेश होत आहे.  सध्या पदवीधर मतदार संघ, जिल्हा परिषद व महापालिका अशा तीन निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेष महाजन व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी दोन भरारी पथके कार्यान्वित केली. त्यात एक व्हीडीओ व्हिजिलन्स तर दुसरे सर्व्हलेंस पथक असून, तालुक्यात कोठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Web Title: Two firing squad in Nashik taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.