दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:16 AM2018-03-25T00:16:57+5:302018-03-25T00:16:57+5:30

जेलरोड नारायणबापू चौक अभिनव आदर्श मराठी शाळेत दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बोर्डाच्या भरारी पथकाचे असल्याचे सांगुन शाळा व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या दोघा भामट्यांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे.

 Two FIRs against bamts | दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

नाशिकरोड : जेलरोड नारायणबापू चौक अभिनव आदर्श मराठी शाळेत दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बोर्डाच्या भरारी पथकाचे असल्याचे सांगुन शाळा व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या दोघा भामट्यांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे.दहावीचा पहिला पेपर (१ मार्च) सुरू होण्यापूर्वी दोघेजण शाळेत येऊन मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना आपण एसएससी बोर्डाच्या भरारी पथकाचे सदस्य असून खोटी बनावट ओळखपत्रे व इतर कागदपत्रे दाखवुन काही शिक्ष कांची नावे देखील सांगितली. मुख्याध्यापक व शिक्षकांचा त्या दोघा इसमांवर विश्वास बसल्याने काही वेळाने त्या दोघांनी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली होती. यावेळी बोर्डाच्या कार्यालयात फोन करून माहिती घेतली असता भरारी पथकाचे कोणीही कुठेच पाठविले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व बोर्डाच्या अधिकाºयांनी लागलीच शाळेला भेट देऊन माहिती घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी दोघा तोतया अधिकाºयांचा कसून शोध घेत संशियत एस. एस. सैय्यद (२०) व त्याचा अल्पवयीन साथीदार मित्र यांना ताब्यात घेतले.

Web Title:  Two FIRs against bamts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.