पांडवलेणीवर अडकलेल्या दोघा युवकांना पोलीस, अग्निशमन दलाने केले रेस्क्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:37 PM2019-05-28T16:37:11+5:302019-05-28T16:39:45+5:30

उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातारणात धमाल करायची म्हणून भाभानगर परिसरातील चार मित्र सकाळी लेणी परिसरात आले. जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावर अडकून पडलेल्या दोघा हौशी तरूणांना सुखरूप खाली उतरविले.

The two friends who were stuck on the Pandavaniya, the police and the fire brigade were rescued | पांडवलेणीवर अडकलेल्या दोघा युवकांना पोलीस, अग्निशमन दलाने केले रेस्क्यू

पांडवलेणीवर अडकलेल्या दोघा युवकांना पोलीस, अग्निशमन दलाने केले रेस्क्यू

Next
ठळक मुद्देपोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती

नाशिक :पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा आहे; मात्र लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विना परवानगी प्रवेश करून डोंगर सर करण्यास भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा आहे, तरीदेखील दोन तरूण मंगळवारी (दि.२८) पुन्हा डोंगर सर करण्याचा प्रयत्नात माथ्यावर पोहचले आणि तेथून पुन्हा खाली येताना डोळे गरगरू लागल्याने आत्मविश्वास ढासळला व आपण सुखरूप खाली उतरून येऊ शकत नसल्याचे त्यांनी डोंगरपायथ्याला असलेल्या अन्य मित्रांना कळविले. त्यानंतर मित्रांनी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलाशी संपर्क साधून आपत्कालीन मदत मागितली. जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावर अडकून पडलेल्या दोघा हौशी तरूणांना सुखरूप खाली उतरविले.
उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातारणात धमाल करायची म्हणून भाभानगर परिसरातील चार मित्र सकाळी लेणी परिसरात आले. लेणी बघितल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा म्हणून निलय कुलकर्णी, गर्व सावलाणी,वंश पंजाबी, मीत कुकरेजा (रा. भाभानगर) या चौघा युवकांनी डोंगर सर करण्यास सुरु वात केली. निलय, गर्व हे दोघे डोंगराच्या माथ्यावर पोहचले तर वंश, मीत हे डोंगराच्या पायथ्यापासून काही उंचीवर असल्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनी धाव घेऊन या दोघांना सुखरूप खाली उतरविले; मात्र डोंगरमाथ्यावर पोहचलेल्या दोघांना उंचीवरून चक्कर येऊ लागल्याने त्यांचे पुन्हा खाली उतरून येण्याचे धाडस झाले नाही. दोघा मित्रांनी येथील नागरिकांना हा प्रकार सांगितला तेव्हा नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत मागितली. काही वेळेतच जलद प्रतिसाद पथकाचे कमांडो, सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान आवश्यक साधनसामुग्री घेऊन पांडवलेणी डोंगरावर पोहचले अन् बचावकार्य सुरू केले. जवानांनी दोरखंड घेऊन डोंगरमाथा गाठला. अडकलेल्या दोघा मित्रांन दोरखंडाच्या सहाय्याने लेणीजवळ सुखरूप उतरविले.

‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती
रविवारी अशाच पध्दतीने अशोकामार्गावरील रहिवासी दाम्पत्य पांडवलेणी डोंगरावर दीड तास अडकून पडले होते. त्यांनाही अशाच पध्दतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू के ले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा मंगळवारी दोघे युवक अडकल्याची घटना घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पालकांनी सकाळच्या सुमारास भटकंती करण्यासाठी जाणाऱ्या आपल्या मुलांना याबाबत बजावणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे. वनविकास महामंडळाने राखीव वनक्षेत्रात प्रवेशास मनाई असल्याचे सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: The two friends who were stuck on the Pandavaniya, the police and the fire brigade were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.