लुटीच्या बनावप्रकरणी फरार दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:13 AM2021-02-08T01:13:41+5:302021-02-08T01:14:24+5:30

मुंबईनाका येथे कारची काच फोडून १५ लाखांची लूट झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार दोघा संशयितांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व त्याचा मित्रच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

Two fugitives arrested in robbery case | लुटीच्या बनावप्रकरणी फरार दोघांना अटक

लुटीच्या बनावप्रकरणी फरार दोघांना अटक

Next
ठळक मुद्देपोलीस कोठडी : आयकर विभागाला पोलीस देणार पत्र

नाशिक : मुंबईनाका येथे कारची काच फोडून १५ लाखांची लूट झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार दोघा संशयितांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व त्याचा मित्रच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
रोलेट व्यावसायिकाची रक्कम लांबविण्याच्या उद्देशाने त्यांनी संगनमत करून जबरी लूट झाल्याचा बनाव शुक्रवारी केला होता. या गुन्ह्यात आता एकूण चौघांना अटक करण्यास आली आहे. त्यापैकी न्यायालयाने संशयित मयूर राजेंद्र भालेराव (२५, रा. तिवंधा चौक),राम सुंदर शिंदे यांना बुधवारपर्यंत (दि.१०) पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित मयूरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.६) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील छान हॉटेलजवळ कारची काच फोडून १५ लाख रुपयांची रोकड पल्सर दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी  लुटून नेल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपासात केल्यानंतर मयुरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने जबरी लुटीचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मयूर व रामला सुरुवातीला बेड्या ठोकल्या. त्यांनी जुन्या भांडणाचा राग धरत वचपा काढण्यासाठी कैलास शहा याने दिलेली रक्कम लांबविण्यासाठी षङ्‌यंत्र रचल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांचे उर्वरित फरार साथीदार संशयित पवन पुजारी व अनिकेत कांबळे या दोघांना रविवारी पोलिसांनी अटक केली. मयूरने हे पैसे त्याचा जोडीदार रोलेटचा बुकी कैलास शहा याच्यासोबत वाद झाल्यानंतर वचपा काढण्यासाठी चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, संशयितांकडून जप्त केलेली रोकड कोणत्या व्यवहारातून आली आहे याचा तपास करण्यासाठी आयकर विभागास पत्र देणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Two fugitives arrested in robbery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.