मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्या  जेरबंद ; लाखोंचे मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:12 AM2018-04-29T00:12:29+5:302018-04-29T00:12:29+5:30

शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाइलवर बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यांमधील पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तब्बल १०९ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

 Two gangs robbing mobile phones; Mobile seizure of millions | मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्या  जेरबंद ; लाखोंचे मोबाइल जप्त

मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्या  जेरबंद ; लाखोंचे मोबाइल जप्त

Next

पंचवटी : शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाइलवर बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यांमधील पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तब्बल १०९ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.  शहर व परिसर तसेच ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणारे वा पायी जाणाºया नागरिकांना रस्त्यात गाठून शस्त्राचा धाक दाखवून मोबाइल लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शहरातील अनेक ठिकाणच्या आठवडे व दैनंदिन भाजीबाजारातही मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले होते. या मोबाइल चोरट्यांचा तपास करत असतानाच काही दिवसांपूर्वी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मोबाइल चोरणाºया टोळीतील संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील सुनील ऊर्फ गटºया नागू गायकवाड, वाडगाव येथील संपत लक्ष्मण वाघ व दिंडोरीरोड अवधूतवाडी येथील विकी ऊर्फ गट्ट्या संजय जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने शहर व जिल्ह्यातील मोबाइल चोरीची कबुली दिली.  पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील दोन संशयित पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, रघुनाथ शेगर, हवालदार मोतीराम चव्हाण, विलास बस्ते, सुरेश नरवडे, संतोष काकड, दशरथ निंबाळकर, संदीप शेळके, महेश साळुंखे, सतीश वसावे, भूषण रायते, विलास चारोस्कर, सचिन म्हसदे, जितेश जाधव, बाळनाथ ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली़
कुख्यात गुन्हेगार
मोबाइल चोरी प्रकरणात पंचवटी पोलिसांनी सुनील ऊर्फ गटºया नागू जाधव या संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहे. जाधव हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर गंगापूर, सिडको, अंबड, सातपूर परिसरांत त्याची मोठी दहशत आहे़
सर्वांत मोठी कारवाई  पंचवटी पोलिसांनी यापूर्वी तब्बल १०५ मोबाइल जप्त करण्याची कारवाई केली होती. शनिवारी पंचवटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेपाच लाख रुपयांचे तब्बल १०९ मोबाइल जप्त केले असून, पोलीस आयुक्तालयातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते़

Web Title:  Two gangs robbing mobile phones; Mobile seizure of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.