साडेचार लाखांना गंडा घालणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:39 PM2021-06-03T23:39:33+5:302021-06-04T01:19:14+5:30
सिडको : सॅनिटायझरचा स्प्रे पंप देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील दोघा ठकबाजांनी नाशिकच्या व्यक्तीला साडेचार लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसादकुमार जठार (वय ३८) व नवनाथ पत्की (वय ४०, दोघे रा. गणेश कॉलनी, बालाजीनगर, पुणे) अशी या दोन ठकबाजांची नावे आहेत.

सॅनिटायझर स्प्रे पंप देण्याचे आमिष दाखवून प्रमोद वासुदेव बागूल (वय ४५, रा. अंबिकानगर, कामटवाडे) यांच्याशी दि. ८ जुलै २०२० रोजी संपर्क साधला. त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. दि. ९ जुलै २०२० रोजी राजमाता एंटरप्रायजेस, ॲक्सिस बँक, पिंपरी चिंचवड शाखा येथील त्यांच्या खात्यावर १ लाख ३० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. तसेच फोन पेद्वारे ४० हजार रुपये इतकी रक्कम प्रसादकुमार जठार याने घेतली. अशा प्रकारे वेळोवेळी प्रसाद कुमार जठार व नवनाथ पत्की यांनी बागूल यांच्याकडून सॅनिटायझरचा पंप देण्याचे आमिष दाखवून ४ लाख ४९ हजार रुपये इतकी रक्कम ॲक्सिस बँकेच्या खात्यावर व फोनपेद्वारे घेऊन बागूल यांची आर्थिक फसवणूक केली. त्यांना सॅनिटायझरचा पंप दिला नाहीच; परंतु रक्कमही परत केली नाही. ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक बेडवाल अधिक तपास करीत आहेत.