बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:55 PM2018-06-27T22:55:49+5:302018-06-27T22:56:19+5:30
वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.
ग्रामस्थ भयभीत : वटार परिसरातील पशुधन धोक्यात; पिंजरा लावण्याची मागणी
वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.
येथील शेतकरी बाबा जयराम बागुल यांच्या पाच शेळ्या एकाच रात्री फस्त केल्या होत्या. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच पुन्हा बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी पारडू फस्त केले होते. एकाच महिन्यात तीन हल्ल्यात आठ प्राण्यांचा बळी गेला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही वनविभाग पिंजरा का लावत नाही, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
सावतावाडी परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसांपासून वावर असून, शेतकºयांना अनेकवेळा दर्शनही झाले आहे. दरवर्षी पाण्याच्या शोधात बिबटे गाव वस्तीवर येतात व पाळीव प्राण्यांवर ताव मारतात. लपण्यासाठी परिसरात मोठी काटेरी जुडपे असल्याने बिबट्यांचा वावर नित्याचा झाला आहे.
वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांत परिसरातील २० पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानवालासुद्धा जीव गमवावा लागण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मंगळवारी घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता, बोरसे यांनी वस्तीवर येऊन पंचनामा केला. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरे लावावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली
आहे.
यावेळी जिभाऊ खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे, पोलीसपाटील किरण खैरनार, मच्छिंद्र बागुल, जिभाऊ बागुल, हिरामण बागुल, हरी बागुल आदी शेतकरी उपस्थित होते.हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांत दरवर्षी चार ते पाच मेंढ्यांचा बळी जात असल्याने मेंढपाळ जेरीस आले आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतो. बिबट्याचा वावर असल्यामुळे वाड्या वस्त्यांवरील शेतकºयांना रात्र जागून काढावी लागत आहे. मेंढपाळ रात्रीच्या वेळी फटाके फोडून आपल्या पशुधनाचे रक्षण करत आहे.