चांदवड तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:33 PM2017-09-07T23:33:17+5:302017-09-08T00:12:11+5:30
तालुक्यातील गणूर व बोराळे येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले असून, चिंचोले येथील ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
चांदवड : तालुक्यातील गणूर व बोराळे येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले असून, चिंचोले येथील ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी ही कारवाई केल्यामुळे ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विनापरवानगी गैरहजर राहणे, ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात अस्वच्छता ठेवणे, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे, ग्रामसेवकांचे पाक्षिक, मासिक तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून न देणे या विविध कारणांसाठी नोटिसा बजावूनही त्यास उत्तर न देता बेशिस्त वर्तन कायम ठेवल्याने गणूर येथील ग्रामसेवक बी.एम. पिंपळसे व बोराळे येथील ग्रामसेवक संजय परदेशी यांच्या निलंबनाची कार्यवाही गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी केली. चिंचोले येथील ग्रामसेवक एस. एल. भदाणे यांची वेतनवाढ रोखली आहे. तालुक्यातील अशाच प्रकारच्या काही ग्रामसेवकांच्या तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झाल्याने संबंधित ग्रामसेवकांना नोटिसा बजावूनही त्यात त्यांनी सुधारणा केली नाही. ग्रामसेवकांच्या बेशिस्त वर्तनामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गटविकास अधिकाºयांनी हा कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. अजूनही काही ग्रामसेवकांवर अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता असल्याने ग्रामसेवकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.