१४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:41 AM2019-10-22T00:41:15+5:302019-10-22T00:42:21+5:30

Maharashtra Assembly Election 2019 शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे.

 Two grandparents who voted 2 times | १४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई

१४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई

googlenewsNext

नाशिक : शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे.
सिंधू शेंदूर्णीकर यांचे वय ८८ वर्षे असून, सध्या त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी नॅशनल उर्दू हायस्कूल येथे जाऊन मतदान केले. त्या मूळच्या देवळा तालुक्यातील रहिवासी. सिंधू अनंत देशपांडे हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. १९३२ साली जन्मलेल्या सिंधूतार्इंचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत टाळाटाळ न करता मतदान केले आहे.
देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.२१) झालेल्या १४व्या विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली विधानसभा मतदारसंघात नाशिक तालुक्यातील गौळाणे येथील सखूबाई नामदेव चुंभळे (वय १००) या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला, असे सखूबाई चुंभळे यांनी सांगितले.

Web Title:  Two grandparents who voted 2 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.