कचरा वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील दोन हॉटेल्सला भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:29 AM2019-05-22T00:29:35+5:302019-05-22T00:29:54+5:30
मनपाच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील दोन हॉटेल्सबरोबरच वीस नागरिकांना दंड करण्यात आला आहे.
नाशिक : मनपाच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील दोन हॉटेल्सबरोबरच वीस नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आता मनपाच्या वतीने ही मोहीम अधिक कठोर करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले असून, घंटागाडीत कचरा टाकतानाच नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयााचे आदेश आणि राज्य शासनाच्या नियमानुसार घरगुती किंवा आस्थापना असलेल्या ठिकाणी ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेने केली असून, गेल्यावर्षी तर नागरिकांना यासंदर्भात नोटीस वजापत्र देण्यात आले होते. गेल्यावर्षी स्वच्छता सर्वेक्षणाचे वातावरण सुरू झाले तेव्हा याबाबत महापालिका सजग होती. मात्र जानेवारीच्या अखेरीस सर्वेक्षण संपताच पुन्हा कचरा वर्गीकरणाच्या कामाबाबत शिथिलता आली. परंतु आता पुन्हा महापालिकेने कारवाईस वेग दिला असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील इनायत कॅफे व मधुबन या दोन हॉटेलचालकांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागांत कचरा वर्गीकरण न करणाºया वीस नागरिकांना पाचशे रुपये याप्रमाणे दंड करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी ही कारवाई यापुढे सुरूच ठेवताना अधिक प्रभावी करण्याचे आदेश दिल्याने महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची ओला आणि सुका कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांवर नजर असणार आहे.