साकोरा येथे बैलगाडीसह दोन तास चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:54 PM2018-08-09T16:54:44+5:302018-08-09T16:55:00+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे आज सकाळी वेहळगाव रस्त्यावर मराठा समाजाच्या वतीने बैलगाडीसह दोन तास चक्का जाम आंदोलन करून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करून तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना निवेदन देण्यात आले.

गुरुवारी (दि. ९) आॅगस्ट क्र ांती दिनाच्या दिवशी आम्ही चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. आतातरी शासनाने सकल मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. सकाळी ९ वाजता साकोरा येथील सर्व मराठा समाजबांधवांनी वेहळगाव रस्त्यावर बैलगाडीसह एकत्र येऊन तब्बल दोन तास जोरदार घोषणाबाजी करीत चक्का जाम आंदोलन करून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, देवदत्त सोनवणे, उपसरपंच संदीप बोरसे, तुषार शेवाळे, प्रशांत बोरसे, रोशन बोरसे, सचिन निकम, संजय बोरसे, बबन सुरसे, प्रकाश बोरसे, योगेश पाटील, रामू बोरसे, अभिजित बोरसे, रोहित बोरसे, संतोष कासलीवाल, अशोक बोरसे, देवीदास बोरसे, मच्छिंद्र बोरसे, अशोक खैरनार, संतोष बोरसे, अनिल निकम, ज्ञानेश्वर बोरसे, शरद बोरसे, सागर वाघ, मुकुंद निकम, दर्शन शेवाळे, सागर जाधव, बाळू बत्तासे, सूरज बोरसे आदी युवकांसह सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते.