पुढील आठवड्यात सुटणार कंत्राटी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आदिवासी विकास आयुक्तांशी दोन तास चर्चा

By admin | Published: February 3, 2015 12:48 AM2015-02-03T00:48:32+5:302015-02-03T00:48:59+5:30

पुढील आठवड्यात सुटणार कंत्राटी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आदिवासी विकास आयुक्तांशी दोन तास चर्चा

Two-hour discussion with Tribal Development Commissioner for the question of contract teachers and non-teaching staff going to be held next week | पुढील आठवड्यात सुटणार कंत्राटी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आदिवासी विकास आयुक्तांशी दोन तास चर्चा

पुढील आठवड्यात सुटणार कंत्राटी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आदिवासी विकास आयुक्तांशी दोन तास चर्चा

Next

नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या कंत्राटी व रोजंदारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल (दि.२) आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्याशी चर्चा केली. पुढील आठवड्यात या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी मंत्रालयात बोलाविण्यात आले आहे. मागील डिसेंबर महिन्यात २३ ते ३१ दरम्यान आदिवासी विकास आयुक्तालयात महाराष्ट्र राज्य कंत्राटी व रोजगार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोेलन केले होते. त्यावेळी आदिवासी विकास मंत्र्यांनी हा प्रश्न आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तांना २ फेब्रुवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला होता. काल या संघटनेच्या पाच पदाधिकाऱ्यांची दुपारी एक ते तीन दरम्यान आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी चर्चा केली. यावेळी डॉ. संजीवकुमार यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून चर्चा करून दिली. त्यावेळी पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने थोडा वेळ झाला. मात्र १० तारखेला मंत्रिमंडळाची बैठक असून, त्यावेळी चर्चेसाठी या शिष्टमंडळाने येण्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या मोर्चेकऱ्यांना निमंत्रण दिल्यानंतर आंदोलन न करण्याचा निर्णय या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यात रितेश ठाकूर, बबिता पाडवी, एस. पी. गावित, संजय भाबड, कमलाकर पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two-hour discussion with Tribal Development Commissioner for the question of contract teachers and non-teaching staff going to be held next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.