मुद्रणालयात दोन तास कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:08 AM2018-06-13T01:08:18+5:302018-06-13T01:08:18+5:30
चलार्थपत्र मुद्रणालयात निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी दोन्ही मुद्रणालयात मंगळवारी सकाळी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मुद्रणालय महामंडळ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती मंगळवारी मुद्रणालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.
नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयात निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी दोन्ही मुद्रणालयात मंगळवारी सकाळी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मुद्रणालय महामंडळ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती मंगळवारी मुद्रणालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. चलार्थपत्र मुद्रणालयातील कॅन्टीनजवळील गटारीच्या सदोष कामावरून गेल्या शुक्रवारी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये वादविवाद होऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले होते. या घटनेची माहिती दिल्लीत मुद्रणालय महामंडळ वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत गेली. त्यानंतर सोमवारी मुद्रणालयाचे महाप्रबंधक के.एन. महापात्रा यांनी मुद्रणालय मजदूर संघ, कार्यकारिणी सदस्य संपत घुगे व जी.वाय. काळे यांना निलंबित केल्याची कारवाई केली. दोघा कामगारांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, कामामध्ये भ्रष्टाचार होऊ नये या मागणीसाठी मंगळवारी सकाळी चलार्थपत्र व भारत प्रतिभूती मुद्रणालयात सर्व कामगारांनी दोन तास कामबंद आंदोलन पुकारले होते. निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुद्रणालय व्यवस्थापन व मजदूर संघाच्या पदाधिकाºयांमध्ये चर्चा सुरू होती. दोन तासानंतर कामगारांनी काम सुरू केले. चलार्थपत्र मुद्रणालयात चार दिवसांपूर्वी झालेला वादविवाद, निलंबनाची कारवाई व सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी दिल्ली मुद्रणालय महामंडळाचे अतिरिक्त व्यवस्थापक विजय गुप्ता, एचआर व्यवस्थापक दुर्गा प्रसाद, ए.के. श्रीवास्तव या तीन वरिष्ठ अधिकाºयांची समिती मुद्रणालयात दुपारी दाखल झाली. घडलेल्या घटनेची सर्व माहिती त्रिसदस्यीय समितीने घेतली. मजदूर संघाचे पदाधिकारी या संदर्भात सायंकाळी त्या समितीच्या अधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी गेल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात मजदूर संघ पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.