जिल्हा रुग्णालयात दोन तास गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:52 AM2018-10-06T01:52:45+5:302018-10-06T01:53:04+5:30
जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या पतीने शुक्रवारी पहाटे प्रायव्हेट रूम व एसएनसीयू वॉर्डात तब्बल दोन तास गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याची घटना घडली़ सुरेश राऊत असे या संशयिताचे नाव असून जिल्हा रुग्णालयात पोलीस व खासगी सुरक्षारक्षक असतानाही, असा प्रकार घडल्याने परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़
नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या पतीने शुक्रवारी पहाटे प्रायव्हेट रूम व एसएनसीयू वॉर्डात तब्बल दोन तास गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याची घटना घडली़ सुरेश राऊत असे या संशयिताचे नाव असून जिल्हा रुग्णालयात पोलीस व खासगी सुरक्षारक्षक असतानाही, असा प्रकार घडल्याने परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़
जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत याची पत्नी प्रसूत झालेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर गत पाच दिवसांपासून राऊत हा जिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळ झोपत होता़ शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास मानसिक तणावाखाली असलेल्या राऊत याने मद्याच्या नशेत गोंधळ घातला़ या ठिकाणी असलेल्या परिचारिकेच्या अंगावर धाऊन जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला़; मात्र परिचारिकेने दरवाजाची कडी लावून घेतली व मदतीसाठी आरडाओरड केली़; मात्र कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही़
सुरेश राऊत याने गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याने महिलांची धावपळ उडाली होती़ अखेर प्रसूती कक्षातील महिलांनी त्यास पकडून त्यास बाहेर काढल्यानंतर सुरक्षारक्षकांना माहिती मिळाली व ते घटनास्थळी धावत आले़
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी
शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती असताना तसेच जिल्हा रुग्णालयाचे स्वतंत्र सुरक्षारक्षक असताना
कोणील पुढे न आल्याने परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़