लेफ्ट हॅण्डर्स स्पर्धेत घेतला अडीचशे स्पर्धकांनी सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:29 AM2020-08-14T00:29:35+5:302020-08-14T00:32:38+5:30
शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डावखुऱ्यांमधील उजवेपणा समाजाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लेफ्ट हॅण्डर्स क्लब नाशिकतर्फे दरवर्षी दि. १३ आॅगस्ट अर्थात लेफ्ट हॅण्डर्स डेच्या निमित्ताने नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे लेफ्ट हॅण्डर्स डे साजरा करता येऊ शकला नसला तरी लेफ्ट हॅण्डर्स क्लबने डावखुºया विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन चित्रकला व निबंध स्पर्धा घेऊन हा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यात पहिली व दुसरीसाठी गट क्रमांक एक, तिसरी व दुसरीसाठी गट दोन, पाचवी व सहावीसाठी गट तीन व सातवी व आठवीसाठी गट चार व निबंध स्पर्धेसाठी नववी व दहावीचा पाचव्या गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक चंद्रशेखर सावंत व रेका धात्रक यांनी केले असून स्पर्धेचा निकाल दोन ते तीन दिवसात जाहीर करून विजेत्या स्पर्धकांना आॅनलाइन प्रमाणप देण्यात येणार असल्याची माहिती लेफ्ट हॅण्डर्स क्लब नाशिकच्या संस्थापक अध्यक्ष नयना आव्हाड यांनी दिली.
विविध विषयांवर स्पर्धा
वेगवेगळ्या गटांमध्ये एकूण अडीचशे स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील नववी व दहावीच्या गटातील ५० डावखुºया विद्यार्थ्यांनी ‘आॅनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे’ तसेच दिली सुट्टी कोरोनाने (दीर्घ सुट्टी उपयोग व इतर ) या विषयांवर निबंध लेखन केले तर पहिली ते आठवीच्या वेगवेगळ्या चार गटांमधील दोनशे विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग पेपरवर त्यांना आवडणाºया वेगवेगळ्या विषयांवरील चित्र रेखाटून आयोजकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविले आहे.