दोन सराईत घरफोड्यांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:08 PM2018-09-26T23:08:48+5:302018-09-27T00:13:48+5:30

शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे़ हसन कुट्टी (रा. म्हसरूळ, मूळ राक़ेरळ) व राजकिशोर बंगाली (रा. मुंबई) अशी या संशयितांची नावे असून, त्यांनी १२ घरफोड्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

 Two hundred and seventeen lakhs of money were seized from the house | दोन सराईत घरफोड्यांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन सराईत घरफोड्यांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

नाशिक : शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे़ हसन कुट्टी (रा. म्हसरूळ, मूळ राक़ेरळ) व राजकिशोर बंगाली (रा. मुंबई) अशी या संशयितांची नावे असून, त्यांनी १२ घरफोड्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़  घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत पंडित कॉलनीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरणार, पोसई बलराम पालकर, पोट कारवाळ, जाकीर शेख, रवींद्र बागुल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मूळ, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले व त्यांच्या इतर सहकाºयांनी सापळा रचून अटक केली़ त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सराफी दुकान, कपडे दुकान, मेडिकल अशा विविध दुकानांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली़ संशयित कुट्टी व बंगाली या दोघांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे दहा तोळे सोने, तीन किलो ५७० ग्रॅम चांदी, ७७ साड्या, महागडे होकायंत्र, दोन मोबाइल फोन, तीन लॅपटॉप, चार एलसीडी टीव्ही, असा सहा लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़
चौकशीसाठी दोघे ताब्यात
पोलिसांनी पकडलेल्या संशयित जोडगोळीने नाशिक शहरातील पंचवटीत (६), म्हसरूळ (२), गंगापूर, भद्रकाली, नाशिक तालुका व औरंगाबाद या ठिकाणी प्रत्येकी एक अशा १२ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे़ या दोघांनाही अधिक तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

Web Title:  Two hundred and seventeen lakhs of money were seized from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.