आयसोलेशन सेंटरला दोनशे ग्रंथ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:39+5:302021-05-01T04:13:39+5:30
काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे अत्यावश्यक रुग्णांना हाॅस्पिटल्समध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. सामान्य रुग्णांना विलगीकरण हाेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा ...
काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे अत्यावश्यक रुग्णांना हाॅस्पिटल्समध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. सामान्य रुग्णांना विलगीकरण हाेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सातपूरला रेशीमगाठी मंगल कार्यालयात ७० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू आहे. बहुतांश दानशूरांनी आर्थिक मदत दिली आहे. परिसरातील बहुतांश खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून मोफत सेवा दिली जात आहे. लोकप्रतिनिधींबरोबरच सामाजिक संस्था आणि कार्यकर्तेही आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्यात संजय जाधव आणि गीता जाधव यांनी रुग्णांना करमणुकीसाठी विविध साधने, विरंगुळ्यासाठी २०० ग्रंथ, रुग्णांना नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा म्हणून संपूर्ण परिसरात फुलझाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे आयसोलेशन सेंटरच्या भिंतींवर सुविचार लिहिलेले फलक लावले आहेत. शिवाय आर्थिक मदतही दिली आहे. या सर्व गोष्टींमुळे कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याने रुग्ण लवकर बरे होऊन आपल्या घरी सुखरूप जाऊ शकतील, अशी भावना संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.
(फोटो ३० सातपूर)- सातपूर येथील आयसोलेशन सेंटरला ग्रंथ, फुलझाडांच्या कुंड्या, सुविचार लिहिलेले फलक आणि करमणुकीची साधने सुपूर्द करताना सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, गीता जाधव.