कोथिंबीर दोनशे रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 01:46 AM2021-10-14T01:46:34+5:302021-10-14T01:46:58+5:30
परतीच्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर उभे पीक खराब झाल्याने बुधवारी (दि. १३) बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला दोनशे रुपये, असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली आहे.
प चवटी : परतीच्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर उभे पीक खराब झाल्याने बुधवारी (दि. १३) बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला दोनशे रुपये, असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली आहे. सोमखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राज्यभर बंद पुकारला होता. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात भाजीपाला लिलाव पूर्ण बंद होते. सोमवारी सायंकाळी बाजार समितीत काही प्रमाणात पालेभाज्या दाखल झाल्याने शेतमालाचा लिलाव झाला. बंदमुळे बाजार समितीत पालेभाज्यांची कमी प्रमाणात आवक आल्याने कोथिंबीरचे बाजार गगनाला भिडले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर मालाला पंधरा हजार रुपये शेकडा दर मिळाला होता. तर पावसामुळे दोन दिवसांनी आवक कमी आल्यामुळे बाजार वाढले. सायंकाळी बाजार समितीत कोथिंबीर आवक अत्यंत कमी प्रमाणात आल्याने कोथिंबीर जुडीला वर्षातील सर्वाधिक असा दोनशे रुपये प्रतिजुडी बाजारभाव मिळाला.